जगात भारी कोल्हापुरी असं का म्हणतात हे फक्त कोल्हापूर मधील वेगवेगळे डिशेश खाल्ल्यानंतर समजतं.
कोल्हापूरची सर्वात स्पेशल आणि प्रसिद्ध रस्सा म्हणजे कोल्हापुरी पांढरा रस्सा. कोल्हापूरला यायचं आणि पांढरा रस्सा खायचं नाही हे गणितच चुकल्या सारखं होतं. म्हणून तर आम्ही आमच्या ग्राहकांसाठी घेऊन आलो आहे अस्सल स्पेशल कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला . हा हिंदवी कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला वापरून तुम्ही घरच्या घरी चविष्ट चटकदार आणि अप्रतिम चवीचा कोल्हापुरी पांढरा रस्सा करू शकता आणि तुमच्या जिभेचे चोचले पुरवू शकता….
  कोल्हापुरी स्पेशल पांढरा रस्सा
एक किलो चिकन किंवा मटण यासाठी 100 ग्रॅम कोल्हापुरी स्पेशल हिंदवी पांढरा रस्सा मसाला पुरेसा आहे.
रेसिपी
प्रथम चिकन/मटन मध्ये दोन तीन  मोठा ग्लास पाणी व मीठ घालून शिजेपर्यंत उखळत ठेवा . चिकन/मटण शिजले की पाण्यातून बाहेर काढावे एका पातेल्यामध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये दोन तीन हिरवी मिरची दोन काळी मिरी, दोन-तीन लवंगा आणि दोन-तीन दालचिनीचे तुकडे वरून घालावेत त्यामध्ये चिकन/मटण शिजवलेले पाणी सूप घालावे . त्यानंतर एका नारळाच्या दोन ग्लास दूधामध्ये हिंदवी स्पेशल कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला घालून एकजीव करून घ्यावे . त्यानंतर हे एकजीव झालेले मिश्रण चिकन/मटण च्या पाण्यामध्ये मिसळावे आवश्यक तितके पातळ करावे चवीनुसार मीठ घालावे व उकळी येईपर्यंत हलवत रहावे गरम-गरम पांढरा रस्सा तयार
प्रमाण- अर्धा किलो चिकन मटन साठी तीन [20 gm]  चमचे वापरा 
सहाकारी पांढरा रस्सा साठी बटाटा, tamyato यांचा स्टोक वापरा
किंमत – 75/-
वजन – 100 gm