#शिवरायांच्या_विचारांनी_भारत_तरला….!
सुलतानी राजवट उलथून टाकणाऱ्या #छ_शिवरायांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आज साडेतीनशे वर्षांनंतरही भारत देश सुरक्षित आणि निश्चिंत आहे.
आज तालिबानचे मानवता धर्माच्या विरोधातील चालू असलेले रणकंदन हे सुलतानी विचारांची पाळे मुळे अफगाणिस्तानच्या मातीमध्ये खोलवर रुजल्यामुळेच. माणूस आणि माणुसकीच्या फाट्यावर मारून आंधळ्या आणि धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद अक्षरश: माणूस धर्माचे लक्तरे वेशीवर टांगत आहेत. ज्या विमानाचा प्रवास करण्यासाठी सुरक्षितीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्याच विमानांमध्ये आज जनावरे कोंबावी तशी माणसे कोंबली जात आहेत. धावपट्टीवरून आसमानात झेप घेणाऱ्या विमानांच्या पंखावरून निरपराध लोकांचा होणारा कडेलोट काळीज चिरत आहे.
कोण कोणत्या धर्माचा पुरस्कार करणार आणि कोणत्या धर्माला विरोध करणार या गोष्टी झाल्या राजकारणाच्या, पण धर्मांध आणि आंधळ्याला धर्म निष्ठेने पिसाळलेल्या जनावराचा नंगानाच पाहूनही ज्यांचे काळीज हेलावून जात नाही आशा धर्म अभिमानी लोकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
आज भारत देश स्थिर आहे, याचे एकमेव कारण आहे शतकर्ते #छत्रपती_शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व. साडेतीनशे वर्षापूर्वी सुलतानी राजवटीत खिरपत पडलेल्या भारतीयांच्या मनात स्वराज्याचा अंकुर फुलवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या #शिवरायांनी सुलतानी राजवटीची पाळेमुळे उपटून टाकली होती. नुसती उपटूनच टाकली नाही तर पुन्हा या मातीमध्ये ती अंकुरित होणार नाही यासाठी स्वतःच्या विचारांचे मशागत या मातीमध्ये केली. त्यामुळेच भारताची लोकशाही भक्कम आणि जगाला मार्गदर्शन करत आहे. छ. शिवरायांच्या उपकाराचे ऋण अजूनही अनेक पिढ्या आपण फेडू शकत नाही.
आधेमधे भारत देशामध्ये स्वतःच्या राजकारणासाठी जातीयतेचा, धर्मांधतेचा फना काढणारे काही औलादी आहेत. स्वतःची खुर्ची बळकट करण्यासाठी तालिबानीच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या नालायकांचे वेळीच कान उपटणे गरजेचे आहे.
राजकारणापायी एकमेकांवर चिखलफेक करणार्या आणि देशाच्या ऐक्याला ओलीस धरणाऱ्या धर्मांध औलादीचे प्रयत्न कदापि सफल होणार नाही कारण शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे विचार पेरलेल्या या मातीमध्ये चिरडले जाण्याची भीती त्यांना मनोमन आहे. आजही शिवरायांच्या तलवारीचा धाक त्यांचे धाडस वाढवून देत नाही. हीच पुण्याई भारत मातेच्या गाठीशी आहे.
घर,बंगला,संपत्ती सर्व काही मागे ठेऊन अंधाऱ्या भविष्यामध्ये फक्त आणि फक्त जीव वाचवण्यासाठी भाबड्या आशेने विमानाकडे धाव घेणारी जनता पाहिली तर आपण किती सुखी आहोत याचा विचार डोक्यामधे येतो. साडेतीनशे वर्षांपूर्वीच सुलतानी राजवटीची पाळेमुळे या देशातून नष्ट करणाऱ्या शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला मुजरा करण्यासाठी काळीज आतुर होते.
#जय_शिवराय
शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी.
संपर्क- 9860752273
- (कृपया लेख , हि विनंती)