गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चंद्रसेन महाराज हे अनेक घराण्याचे कुलदैवत आहे.मायणी,म्हसवड,वीटा, या भागातील अनेकांचे हे कुलदैवत आहे. चैत्रातल्या दुसर्या आठववड्यात पोर्णिमेला वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळि आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.

#गडावर_पोहोचण्याच्या_वाटा
वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. या गावात सरसेनापती यांचे भव्य समाधी स्मारक आहे. याच स्मारकामध्ये एक तोफ आणि एका तोफेचे अवशेष पाहायला मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने हा परीसर सुशोभित केल्याने सारसेनापती हंबीरराव मोहीते यांच्या समाधी स्मारकास वेगळे रूप प्राप्त झाले आहे. याच स्मारकाच्या परीसरात अजूनही पाच ते सहा समाध्या आपले लक्ष वेधून घेतात तत्कालीन इतिहास पुरूषांच्या समाध्या असण्याची दाट शक्यता आहे.
स्मारकाच्या मागिल बाजून अत्यंत देखणे राम लक्ष्मणन सीतेचे मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते.साईरंग महाराजांनी मोठे परिश्रम घेतल्याचे हे मंदिर पाहताना लक्षात येते.
कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड – सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे.
याशिवाय कराड – चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे.

राहाण्याची सोय
चंद्रसेनच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही, कराडमध्ये आहे.

पाण्याची सोय
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ
१) तळबीड मार्गे १ तास लागतो.
२) वसंतगड गावामार्गे १ तास लागतो