वेड्यात वीर दौडले सात…
वीर प्रतापराव गुजर समाधी दर्शन नेसरी…..
आजचा दिवस खरच भाग्याचा. गडिंग्लज जवळील सामानगडावरून थेट 17 किमी असणाऱ्या नेसरी या प्रतापराव गुजर आणि सहा मावळ्यांच्या रक्ताने पुनीत झालेल्या गावाकडे कुच केली. अतियश संपन्न निसर्गाच्या खूशीत हे छोटेसे टुमदार गाव वसले आहे. गावाच्या मुख्य चौकातील प्रतापराव गुजर यांचा अश्वारूढ भव्य पुतळा शिवकाळातील तेजस्वी इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या पुतळ्यास वंदन करून. सात वीरांच्या समाधी दर्शनासाठी नेसरीच्या बलिदानी रक्ताने पावन झालेल्या खिंडीकडे कुज केली. महाराष्ट्रात शासनाने या शौर्य स्मारकाचा जिर्णोध्दार करून अतिशय संदुर स्मारक तयार केल्याचे पाहीले. मुख्य दरवाजातून आत आल्यावर सात वीरांच्या सात समशेरी उभा गोलाकार लावल्या असून त्यावर ढाल अशी वैशिष्ट्येपूर्ण रचना खरच गौरवशाली इतिहासाची साक्ष दिल्याशिवाय नाही. या स्मारकाला वंदन केले. प्रतापराव गुजर आणि सहा वीरांच्या चरणी मी लिहले ” फक्त शिवराय” हे पुस्तक अर्पण केले. याच स्मारका समोर शौर्य स्तंभ असून त्यावर असणारे प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाचे माहीती वाचली कि अंगावरती काटा उभा राहातो. याच स्तंभा जवळच शिवरायांचा भला मोठा पुतळा इतिहास प्रेमींचे लक्ष वेधून घेतो, या शौर्य स्मारकाची देखरेख करणारे श्री गजानन रेडेकर काका इनामेइतबार आपली सेवा बजावात आहै. त्यांनाही एक पुस्तकाची प्रत भेट दिली…..
प्रत्येक मावळ्याने शिवभक्तांनी ही नेसरीची खिंड पहावी. प्रतापराव गुजर आणि सहा मावळ्यांच्या रक्ताने भिजलेली ही शौर्य भूमी याची देही याची डोळा अनभुवावी याच साठी हा सारा प्रपंच….
प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाची थोडक्यात माहीती…..
वेड्यात वीर दौडले सात….
बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने रयतेवरअन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.
मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरणआला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठमराठ्याने त्याला धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.
पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रासदेणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रातएक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल. शिवरायांनी म्हटल होत की बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये. हे वाक्य वाचुन त्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दिली. नेसरीच्या खिंडीत जबरदस्त रणकंदन झाले यामध्ये हे सात मराठा वीर धारातिर्थ पडले

त्या सात योद्धांची नावे-

०१) विसाजी बल्लाल.

०२) दीपाजी राउतराव.

०३) विट्ठलपिलाजी अत्रे.

०४) कृष्णाजी भास्कर.

०५) सिद्धिहिलाल.

०६) विठोजी शिंदे.
आणि

०७) सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर.

या सात मावळ्यांना मानाचा मुजरा…
सोबत अकाश बुधले..